जनतेशी थेट संवाद हाच उद्देश

जनतेशी थेट संवाद हाच उद्देश
Published on

swt2717.jpg
33816
खारेपाटण ः महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिरात विविध महसुली दाखल्यांचे वितरण जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जगदीश कातकर, दीक्षांत देशपांडे, गुरुप्रसाद शिंदे, प्रवीण लोकरे आदी मान्यवर.

जनतेशी थेट संवाद हाच उद्देश
तृप्ती धोडमिसे ः खारेपाटण येथे ‘समाधान’ शिबिरास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २७ : सर्वसामान्य नागरिकांना महसुली दाखले जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मिळविणे खूप खर्चिक होत असल्याने नागरिकांचा वेळ व त्रास वाचावा आणि प्रशासन आणि जनता यांचा संवाद यातून साधता यावा, प्रलंबित कामे पूर्ण करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कणकवली तहसील कार्यालयाच्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथील (कै.) चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात झालेल्या या समाधान शिबिर टप्पा क्र.१ चे उद्घाटन जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी विभागीय प्रांत अधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार, कणकवली पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, राजेश जाधव, कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शरद कर्ले, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, खारेपाटण हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्राचार्य संजय सानप, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, चिंचवली सरपंच अशोक पाटील, कुरंगावणे सरपंच संतोष ब्रम्हदंडे, वायंगणी सरपंच अस्मी लाड, नडगिवे सरपंच माधवी मण्यार, वारगाव सरपंच नाना शेट्ये, शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, संजय गांधी विभाग नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल नायब तहसीलदार मुकुंद मुंडले, सहाय्यक महसूल अधिकारी संभाजी खाडे, संजय गांधी सहाय्यक अधिकारी धनंजय सिंगनाथ, खारेपाटण मंडल अधिकारी श्रीमती बावलेकर, खारेपाटण महसूल ग्राम विकास अधिकारी प्रवीण लुडबे, वारगाव तलाठी रवींद्र अम्रासकर, शेर्पे तलाठी अनघा अग्निहोत्री, खारेपाटण ग्राम विकास अधिकारी विशाल वरवडेकर आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी कातकर यांनी प्रास्तविक केले. मुख्याध्यापक सानप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या समाधान शिबिराच्या माध्यमातून सुमारे २०० पेक्षा अधिक नागरिकांचे विविध दाखले ऑनलाईन काढून देण्यात आले. अनेक नागरिकांना विविध महसुली दाखल्यांचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन खारेपाटण कॉलेजच्या शिक्षिका दर्शना पाताडे यांनी केले. आभार कणकवली तहसीलदार देशपांडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com