स्पर्धा परीक्षेमध्ये सान्वीला ‘सुवर्ण’

स्पर्धा परीक्षेमध्ये 
सान्वीला ‘सुवर्ण’
Published on

33894

स्पर्धा परीक्षेमध्ये
सान्वीला ‘सुवर्ण’
कुडाळ, ता.२८ : मालवण शहरातील रोझरी इंग्लिश स्कूलमधील तिसरीची विद्यार्थिनी सान्वी परब हिने ‘बीडीएस’ आणि ‘एसटीएस’ या दोन्ही परीक्षांमध्ये सुवर्णपदक पटकावून यश प्राप्त केले. ‘बीडीएस’ परीक्षेत १०० पैकी ९४ गुण मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले. विशेष म्हणजे, या परीक्षेत सुवर्णपदक मिळवण्याचे तिचे ही सलग तिसरे वर्ष आहे. जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या एसटीएस परीक्षेत २०० पैकी १८० गुण मिळवून तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सान्वी ही मालवण तालुक्यातील वायंगणी येथील उद्योजक विक्रम परब यांची कन्या आहे. तिला या यशासाठी प्रशालेतील शिक्षक आणि तिची आई सौ. प्राची परब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सान्वीच्या या यशाबद्दल संस्थेचे चालक व मुख्याध्यापक अल्विन गोंसलवेस यांनी तिचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com