

ratchl२८२.jpg
२६O३३९३६
चिपळूण ः चोरट्यांनी फोडलेले कपाट.
चिपळूण परिसरात
चोरट्यांचा धुमाकूळ
चिपळूण ः शहरातील पागमळा परिसरातील दोन बंद फ्लॅट तसेच मार्कंडी भागातील तीन दुकाने चोरट्याने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी उच्छाद मांडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून, त्याचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पागमळा येथील एकाच अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवली तर मार्कंडी परिसरात तीन दुकानांच्या शटरची पट्टी वाकवून चोरी करण्यात आली. दरम्यान, सीसीटीव्ही फूटेजमध्ये दोन संशयित चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसून आले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. या घटनेचा तपास चिपळूण पोलिस करत आहेत.
निवे बुद्रुक शिंदेवाडीत
दागिन्यांची चोरी
देवरूख ः संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक येथील शिंदेवाडी परिसरात राहणाऱ्या संतोष दौलत पाल्ये यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २४ जानेवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडली. पाल्ये यांच्या घरातील बंद कपाटात ठेवलेला एक सोन्याचा हार आणि एक सोन्याची चेन अज्ञाताने चोरून नेली आहे. पाल्ये यांनी या चोरीबाबत देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.