

rat२८p११.jpg-
26O33915
संगमेश्वर ः सभासद नोंदणी करताना उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी.
------
कडवईत परिवहन कार्यालयाचे शिबिर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ ः तालुक्यातील कडवई येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाच्या सभासद नोंदणीबाबत विशेष मार्गदर्शन व सभासद नोंदणीसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या वेळी रिक्षामालक-चालक संघटना कडवई-तुरळ -चिखलीच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात अनेक ठिकाणी कॅम्प घेऊन धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाबाबत मार्गदर्शन केले जात आहे व त्याच ठिकाणी सभासद नोंदणी करून घेतली जात आहे. काल कडवई ग्रामपंचायत हॉल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहाय्यक मोटरवाहन निरीक्षक अवधूत कुंभार व अक्षय पाटील यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केले व त्याच ठिकाणी उपस्थित रिक्षा व्यावसायिकांची मंडळाची सभासद नोंदणी करण्यात आली. या वेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सभासद होण्यासाठी असणारी तीन मुलांची अट शिथिल करावी, अशी मागणी केली. या वेळी कडवई ग्रामपंचायत व रिक्षासंघटना यांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी कडवईचे प्रभारी सरपंच (प्रशासक) दत्ताराम ओकटे, ग्राम अधिकारी राहुलकुमार चौधरी, ग्रामपंचायत कर्मचारी, मोटरवाहन विभागाचे चालक नरसिंह काळे, रिक्षा संघटनेचे खजिनदार रूपेश रहाटे, सदस्य राजेंद्र भोजने, प्रमोद शिंदे, बावा मयेकर, राजा येलोंडे, तुषार कदम व इतर सभासद उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.