मसाला आंतर पीकामुळे आर्थिक हातभार

मसाला आंतर पीकामुळे आर्थिक हातभार
Published on

33951

मसाला आंतरपिकामुळे आर्थिक हातभार

वैभव शिंदे : जामसंडे येथे कृषी महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ ः तालुक्यात देवगड हापूस आंबा पिकाचे महत्त्व अधोरेखित आहेच. मात्र, आंबा आणि काजू उत्पादनाबरोबर उपलब्ध जागेत शेतकरी बागायतदारांनी मसाला आंतरपीक घेतल्यास कुटुंबाला आर्थिक हातभार लागू शकेल, असे मत वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक वैभव शिंदे यांनी जामसंडे येथे व्यक्त केले.
मसाला पिकाचे विविध प्रकार, त्यापासून मिळणारे उत्पादन आणि त्याचा बाजारभाव याअनुषंगाने सविस्तर माहितीही दिली. राज्य शासन कृषी विभागातर्फे जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी ‘मसाला पीक व्यवस्थापन’ या विषयावर श्री. शिंदे बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, सावी लोके, देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, संजना लाड, रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, उष:कला केळुसकर, पंचायत समिती कृषी अधिकारी दिगंबर खराडे, मानसी पवार उपस्थित होते.
यानिमित्ताने शेतकरी देवेंद्र नारकर (विठ्ठलादेवी), रंजना कदम (इळये) यांचा सन्मान केला. भातपीक स्पर्धेतील यशस्वी शेतकरी मंगेश वारीक (पडेल), लक्ष्मण राऊत (कोटकामते), दत्ताराम भाटकर (बागतळवडे) यांचाही सन्मान झाला. श्री. शिंदे यांनी, आंबा आणि काजू उत्पादन आणि त्याच्या जोडीला मसाला उत्पादन कसे घ्यावे, त्यासाठी आवश्यक वातावरण या अनुषंगाने माहिती दिली.
अ‍ॅड. गोगटे यांनी, शेतकऱ्यांनी आंबा शेतीसह मसाला उत्पादन घ्यायला हवे, असे सांगून कुळीथ, भुईमूग उत्पादनही घेतले जाते. बचतगटांनीही व्यवसायात नावीन्यपूर्ण बदल केल्याचे नमूद करून बचतगटांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध होण्याची आवश्यकता व्यक्त केली. सभापती श्री. राणे यांनी, शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकरी योजनांपासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. विविध पातळीवर शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले. कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांनी विविध कृषी योजनांची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप कदम यांनी आभार मानले.
.........................................
स्टॉलना प्रतिसाद
कृषी महोत्सवानिमित्ताने विविध कृषी उत्पादने, कृषी अवजारे, बचतगटांची विविध उत्पादने, खाद्यपदार्थांच्या मांडलेल्या स्टॉलला मान्यवरांनी भेटी दिल्या. या स्टॉलना प्रतिसाद मिळाला. गावठी अंडी, ओले -सुके काजूगर, विविध प्रक्रिया उत्पादने यांचाही यामध्ये समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com