नेत्रपटल तपासणीला मालवण येथे प्रतिसाद

नेत्रपटल तपासणीला मालवण येथे प्रतिसाद
Published on

33952

नेत्रपटल तपासणीला
मालवण येथे प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : येथील रोटरी क्लब आणि आरसीसी क्लबच्या संयुक्त विद्यमाने येथील लिमये हॉस्पिटलमध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी ‘मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) ओसीटी तपासणी’ शिबिराचे आयोजन नुकतेच केले होते. या शिबिराचा लाभ ५२ रुग्णांनी घेतला. पैकी ७ रुग्णांना पुढील उपचारांची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर सांगली येथे मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन आणि सुदर्शन आय हॉस्पिटल, सांगली यांची ‘मोबाईल व्हॅन’ उपलब्ध करून दिली होती. शिबिराचे उद्‍घाटन सांगली मिडटाऊन रोटरी क्लबचे मल्लिकार्जुन बड्डे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. सुरेश वाघ, मालवण रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज पेडणेकर, सचिव रंजन तांबे, डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, महादेव पाटकर, राजेश पारधी, रमाकांत वाक्कर, उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, प्रदीप सामंत, मिथिलेश मिठबावकर, प्रसन्नकुमार मयेकर, अभय कदम, प्रविणा शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com