रत्नागिरी- आसमंत फाउंडेशनकडून सहाय्य

रत्नागिरी- आसमंत फाउंडेशनकडून सहाय्य
Published on

rat28p17.jpg-
33935
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी समिक्षा सावंत हिला आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनकडून मिळालेल्या मदतीचा धनादेश देताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर. सोबत डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सीमा कदम, डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. विवेक भिडे, प्रा. सचिन सनगरे आणि महेश सरदेसाई उपस्थित.

आसमंत फाउंडेशनकडून
गोगटेच्या विद्यार्थ्यांना सहाय्य
रत्नागिरी, ता. २९ : आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन या रत्नागिरीमधील समाजसेवी संस्थेने सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून सागर महोत्सव व होतकरू विद्यार्थ्यांच्या गुणांना संधी देण्यासाठी ५० हजार रुपयांचे साह्य गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयास दिले.
आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी सागर महोत्सवाअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यास सांगितले. आसमंत फाउंडेशन कोकण आणि पश्चिम घाटात शाश्वत विकास, निसर्ग संवर्धन, शिक्षण आणि संगीतासाठी काम करत आहे. फाउंडेशनने सागर महोत्सवसारख्या उपक्रमांद्वारे जबाबदार पर्यटन, पर्यावरण रक्षण आणि जैवविविधतेवर भर दिला.
आपल्या सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून सागर महोत्सव साजरा केला. जबाबदार पर्यटन आणि समुद्रकिनारा स्वच्छता या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जनजागृती उपक्रमांसाठी जे आर्थिक सहाय्य मिळाले त्यातून १६ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला. तसेच समीक्षा सावंत (प्रथम वर्ष विज्ञान) या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनने आर्थिक मदतीचा हातभार लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com