

rat29p1.jpg -
34086
रत्नागिरी : खल्वायनच्या मैफलीत गायन करताना अर्चना कान्हेरे. सोबत सहगायक अपूर्वा रानडे, वैदेही मेकडे. वाद्यसाथ हेरंब जोगळेकर, श्रीरंग जोगळेकर, अमित ओक व दीप्ती कानविंदे.
--------
अर्चना कान्हेरे यांची बहारदार गायकी
खल्वायनची मैफल ; माणिक वर्मांच्या जन्मशताब्दीनिमित्त मैफल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : खल्वायन संस्थेच्या गुढीपाडवा विशेष संगीत मैफल अष्टपैलू गायिका माणिक वर्मा यांच्या ज्येष्ठ शिष्या व प्रसिद्ध गायिका विदुषी अर्चना कान्हेरे यांच्या गायनाने रंगतदार झाली. गुरुकृपा मंगल कार्यालयात मैफलीला श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात लाभला. या मैफलीसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज सहकार्य केले. गायिका माणिकताई वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने ही मैफल आयोजित केली. माणिकताईंच्या स्वरांनी अजरामर केलेले विविध गानप्रकार सादर करून श्रोत्यांना अर्चना कान्हेरे यांनी स्वर प्रतिभेची आठवण करुन दिली.
उद्योजक, ऑर्गन वादक राजेंद्र भडसावळे यांनी नटराज पूजन केले. शुभदा दादरकर यांनी लिहीलेल्या आणि अर्चना कान्हेरे यांनी संगीतबद्ध केलेल्या माणिक गौरव गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. दीप्ती कानविंदे यांनी अर्चना कान्हेरे यांच्याशी संवाद साधत माणिक ताईंच्या सांगीतिक जीवनाचा आढावा घेत कार्यक्रम संवाद रूपाने पुढे नेला. अर्चना कान्हेरे यांना माणिकताईंचा १४ वर्षे सहवास लाभला.
मैफलीत त्यांनी शामकल्याण रागातील एक बंदिश, ठुमरी, पुष्प पराग हे नाट्यपद, सावळाच रंग तुझा, मराठी गझल त्या चित्त चोरट्याला हे गीत प्रकार सादर केले. अपूर्वा रानडे यांनी तारिणी नववसन धारिणी, पाहतेच वाट तुझी तसेच वैदेही मेकडे यांनी येऊ कशी घनश्याम, जाळीमंधी पिकली करवंद ही गीते सादर केली. तिन्ही गायकांनी मेलडी सादर करून मैफलीचा शेवट केला. तबला साथ हेरंब जोगळेकर, हार्मोनियम श्रीरंग जोगळेकर, ऑर्गन अमित ओक यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.