

rat29p12.jpg
34106
रत्नागिरी : अध्यात्म मंदिरात आयोजित कार्यक्रमात नर्मदा परिक्रमा करणारे मिलिंद तेंडुलकर यांचा सन्मान करताना सारस्वत स्नेहवर्धक मंडळाचे अध्यक्ष योगेश सामंत. सोबत निखिल महाराज व हृषिकेश पटवर्धन.
--------
नर्मदा परिक्रमा म्हणजे मनाच्या शुद्धीचा प्रवास
मिलिंद तेंडुलकर ः वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात अनुभवकथन
रत्नागिरी, ता. २९ : नर्मदा परिक्रमा म्हणजे पावलांचा प्रवास नाही तो मनाच्या शुद्धीचा प्रवास आहे. परिक्रमेचा मार्ग कठीण असतो, पण त्या मार्गावर श्रद्धा पावलाने बळ देत राहते, असे प्रतिपादन मिलिंद तेंडुलकर यांनी केले.
सारस्वत स्नेहवर्धक मंडळ आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) यांच्यावतीने नर्मदे हर : नर्मदा परिक्रमेचा दिव्य अनुभव या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात झाला. याप्रसंगी मिलिंद तेंडुलकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मिलिंद तेंडुलकर यांनी नर्मदा परिक्रमेतील अनुभवकथन केले. प्रवासातील विविध टप्पे, निसर्गरम्य स्थळे, परिक्रमेतील अध्यात्मिक आणि मानवी अनुभव यांचे सविस्तर वर्णन त्यांनी केले. या अनुभवांदरम्यान प्रा. सौ. विस्मया कुळकर्णी यांनी संवादात्मक मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान नर्मदा परिक्रमेच्या प्रवासाचे छायाचित्रे आणि माहिती दर्शविणारे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले, ज्यामुळे श्रोत्यांना परिक्रमेचा अनुभव अधिक जिवंतपणे अनुभवता आला.
कार्यक्रमास स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे सचिव हृषिकेश पटवर्धन, विवेक भावे, निखिल महाराज, सारस्वत स्नेहवर्धक मंडळाचे अध्यक्ष योगेश सामंत, सचिव प्रदीप तेंडुलकर, कोषाध्यक्ष मनीषा रेगे, सचिन तेंडुलकर, रमेश साखळकर, गुरुप्रसाद बोरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन निनाद तेंडुलकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.