हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा

हनुमान मंदिरात 
जन्मोत्सव सोहळा
Published on

हनुमान मंदिरात
जन्मोत्सव सोहळा
सावंतवाडी ः रत्नागिरी शहरातील मारुती आळी येथील सुप्रसिद्ध प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये २ एप्रिलला सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. या आनंद सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे आणि श्री हनुमानाच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मारुती मंदिर संस्था विश्वस्त मंडळ व कार्यकर्त्यांनी केले आहे. सोहळ्यानिमित्त मंगळवारपासून (ता. ३१) मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ३१ मार्चला सकाळी ९ वाजता हनुमान याग, १ एप्रिलला श्रींचा वाढदिवस असून सकाळी पूजाअर्चा, लघुरुद्र, अभिषेक सायंकाळी ५ वाजता ह. भ.प. श्री लक्ष्मीप्रसाद पटवारी (बीड) यांचे सुश्राव्य कीर्तन, सायंकाळी ७:३० वाजता भक्ती संध्या हा कार्यक्रम ओंकार संसारे यांचा कार्यक्रम होईल. रात्रौ ९:०० वा. भोवत्या होतील. २ एप्रिलला श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा होणार आहे.
-----
धामणकर यांना
‘शौर्य’ पुरस्कार
कणकवली ः माखजन (जि. रत्नागिरी) गावचे सुपुत्र परमेश्वर कांता धामणकर यांना अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने स्वा. विनायक दामोदर सावरकर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महावितरणच्या कंत्राटी कर्मचारी म्हणून आरवली विद्युत उपकेंद्रांतर्गत तारतंत्री पदावर कार्यरत असलेले परमेश्वर धामणकर ऊन, पाऊस, वारा किंवा रात्रीचा अंधार यांची पर्वा न करता वीजसेवा सुरळीत ठेवण्यासाठी जोखमीची कामे तत्परतेने पार पाडतात. त्यांच्या समर्पित सेवेमुळे माखजन पंचक्रोशीतील गावांमध्ये वीजपुरवठा कायम सुरळीत राहतो. काम करताना त्यांना काही अपघातही झाले असले तरी त्यांनी कर्तव्याप्रती कधीही कसूर केली नाही. त्यांच्या धाडसी व निष्ठावान सेवाकार्याची दखल घेत मंडळाने त्यांचा गौरव केला.
---
संकेत नेमण
पोलिस दलात
सावंतवाडी ः राजापूर तालुक्यातील तळवडे मोरेवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नेमण यांचे सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवले आहे. या यशाबद्दल त्यांचे तळवडे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे. तळवडेचा सुपुत्र संकेत नेमण यांचे शालेय शिक्षण अंधेरी-मुंबई येथे झाले असून, त्यांचे पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम, नियमित अभ्यास व शारीरिक तयारीच्या जोरावर पोलिस होण्याचे स्वप्न साकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com