सोनवी पुलाची मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन फोल

सोनवी पुलाची मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन फोल
Published on

महामार्ग विभागाचे आश्वासन हवेत
सोनवी पुलाची एक मार्गिका सुरू नाही; वाहनचालक हैराण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होणे म्हणजे एक चेष्टेचा विषय झाला आहे. जनआक्रोश समितीने संगमेश्वर येथे ११ जानेवारीला केलेल्या रास्ता रोको आंदोलना दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाने संगमेश्वर येथील सोनवी पुलाची एक मार्गिका ३१ मार्चपूर्वी सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र मार्च महिना संपत आला असताना अद्याप ही एक मार्गिका सुरू न केल्याने हे आश्वासन देखील फोल ठरले आहे.
संगमेश्वर येथील सोनवी पुलाचा परिसर म्हणजे वारंवार होणारी वाहतूक कोंडी. एकदा का येथे वाहतूक कोंडी झाली की किमान दीड तास तरी वाहन चालकांचा आणि प्रवाशांचा खोळंबा होतो. संगमेश्वर येथे वाहतूक कोंडीत वाया जाणारा वेळ लक्षात घेता प्रवाशांकडून ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्गाच्या नावाने वेळोवेळी शिमगा केला जातो. मात्र या दोघांवरही याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे रखडलेले काम लक्षात घेता जनआक्रोश समितीने पनवेलपासून हातखंब्यापर्यंत ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने केली. संगमेश्वर येथे सोनवी पुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधण्यासाठी ११ जानेवारीला रास्ता रोको केला होता. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनआक्रोश समितीला सोनवी पुलाची एक मार्गिका ३१ मार्चपूर्वी सुरू करू, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही ही मार्गिका सुरू झालेली नाही. या पुलाच्या दोन्ही बाजूचे काम होणे बाकी आहे.
----
महामार्गाच्या दर्जाची पाहणी करा
मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली ते बावनदी या हद्दीतील कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची पातळी समान नसल्याने वाहन वेगाने जात असताना मध्येच वाहन आपटून आतील प्रवाशांना मार बसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तज्ज्ञ समितीमार्फत महामार्गाच्या दर्जाची पाहणी करावी आणि नंतर काम पूर्ण झाल्यावरच टोल सुरू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश कदम यांनी केली आहे.
-----
कोट
जनआक्रोश समितीने संगमेश्वर रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी आले. त्यांनी ३१ मार्चपूर्वी सोनवी पुलाची एक मार्गिका कोणत्याही परिस्थितीत सुरू करू असे लेखी आश्वासन दिले होते. आता ही मार्गिका पूर्ण होण्यास अजूनही कालावधी लागणार आहे. आंदोलन केले म्हणून जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. दिलेले लेखी आश्वासन न पाळणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार?
-- युयूत्सु आर्ते, कार्यकर्ता, जनआक्रोश समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com