

34148
गोळाफेक स्पर्धेमध्ये
अंतरा मठकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २९ ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे क्र. २ सातवीतील विद्यार्थिनी अंतरा मठकर हिने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तिला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. मेहनत, चिकाटी आणि शिस्तबद्ध सरावामुळेच हे यश मिळाल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. शाळेच्यावतीनेही तिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपसरपंच रामचंद्र गावडे, अंतराचे वडील बापू मठकर, आई अनुष्का, प्रवीण बर्वे, बाबा पालव, तुषार पालव, विश्राम पोळजी, भरत कांबळी, लवू कांबळी, अनिल मठकर, सुरेंद्र मठकर, अजित पोळजी, संदेश कांबळी, रेश्मा कांबळी, कांती मठकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उल्लेखनीय यशाबद्दल अंतराचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.