

rat३०p३०.jpg-
P26O34351
मंडणगड : जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्याकडे सुसज्ज नाट्यगृह उभारण्याच्या मागणी संदर्भातील निवेदन देताना मंडणगडमधील नाट्यकर्मी.
--------
मंडणगडात सुसज्ज नाट्यगृह उभारा
नाट्यकर्मींची मागणी ; ‘गाडी चुकली’ नाटकाचा रंगला प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३० ः राज्य हौशी नाट्यस्पर्धेत गौरवप्राप्त लेखक दिग्दर्शक सुनील माळी यांच्या गाडी चुकली आणि.... या दोनअंकी नाटकाचा प्रयोग भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात रंगला. या वेळी मंडणगडमध्ये सर्व सुविधांनी परिपूर्ण नाट्यगृह व्हावे, अशी मागणी नाट्यकर्मी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, तहसीलदार अक्षय ढाकणे आणि नगरपंचायतीकडे केली.
सामाजिक आशयावर आधारित कथानक, एकाचवेळी अनेक घटनांमधून पुढे सरकणारी मांडणी, प्रभावी संवाद आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या नाटकात आदेश घडवले, सोनाली भातडे, सुनील माळी, स्वप्नील कद्रेकर, अतुल पवार, तृषा माळी, रवींद्र जावळे, महेश भानशे, स्वाती घरत, मिलिंद रहाटवळ, प्रणया शिंदे, केतन तानकर, राजेश जावळे, नरेंद्र विचारे, सुशांत आग्रे, रणजीत जगदाळे, प्रशांत कुळे, प्रवीण पास्टे, विनायक हंबीर, संतोष घडशी, अश्विनी घडवले, सुनील मांडवकर यांनी भूमिका साकारल्या.
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, सदस्य प्रताप घोसाळकर, तहसीलदार अक्षय ढाकणे, नगरसेवक आदेश मर्चंडे, विनोद जाधव, निवृत्त पोलिस अधिकारी रमेश घडवले, भाई पोस्टुरे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील नाट्यकर्मींनी मंडणगड येथे सर्व सुविधांनी सुसज्ज नाट्यगृह उभारण्याची मागणी संदर्भातील निवेदन अस्मिता केंद्रे, अक्षय ढाकणे यांना देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.