पोलिस लाईन रस्ता होणार ‘खड्डेमुक्त’

पोलिस लाईन रस्ता होणार ‘खड्डेमुक्त’
Published on

34480

पोलिस लाईन रस्ता होणार ‘खड्डेमुक्त’

सावंतवाडीत भूमिपूजन; समाज मंदिर रस्त्याचेही काम मार्गी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः गेल्या महिन्यापासून प्रलंबित असलेला पोलिस लाईन येथील रस्ता आणि समाज मंदिर येथील कर्मचारी वसाहतीच्या दुरुस्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते या दोन्ही कामांचे भूमिपूजन झाले. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या खाकीला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
पोलिस लाईन येथील रस्ता खड्डेमय झाला होता. त्यामुळे तेथून प्रवास करणे कठीण बनले होते. कर्तव्यावर ये-जा करणाऱ्या पोलिस बांधवांना या खराब रस्त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन प्र. नगराध्यक्ष निरवडेकर यांनी तातडीने पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवून दिली. या रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याने पोलिस बांधवांनी समाधान व्यक्त केले. समाज मंदिर परिसरातील नगरपालिका कर्मचारी वसाहतीच्या दुरुस्ती कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले. वसाहतीची दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. ती आता या दुरुस्तीमुळे दूर होणार आहे. याप्रसंगी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सभापती आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, दीपाली भालेकर, प्रतीक बांदेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, नगरपरिषद अभियंता श्री. सरडे, पुरोहित बाळू कशाळीकर यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी, पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांच्या प्रारंभामुळे पोलिस वसाहत आणि कर्मचारी वसाहतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com