

मिरजोळीतील उत्खननाची चौकशी करा
चिपळूण, ता. ३१ ः तालुक्यातील मिरजोळी साखरवाडी येथे डोंगरउतारावर मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. नजीकच्या वस्तीला त्यापासून धोका उद्भवल्याची शक्यता आहे. या विषयी सखोल चौकशी करावी, अशी मागणी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे भाजपचे महेश कांबळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील पाग येथील महेश कांबळी यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, मिरजोळी येथील एजन्सीच्या मागील डोंगरात मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम करून शासनाचा महसूल बुडवला जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदार लोकरे यांनी या विषयी गांभीर्याने लक्ष घालावे, संबंधित उत्खननास महसूल विभागाची परवानगी घेतली नसल्यास संबंधितावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील कांबळी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.