पाककला स्पर्धेमध्ये कीर्ती म्हसकर प्रथम

पाककला स्पर्धेमध्ये कीर्ती म्हसकर प्रथम
Published on

पाककला स्पर्धेमध्ये
कीर्ती म्हसकर प्रथम
नांदगाव ः नांदगाव ग्रामस्थ आणि सरस्वती हायस्कूल यांच्यावतीने प्रशालेच्या सभागृहात महिला दिन उत्साहात साजरा केला. यावेळी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत कीर्ती म्हसकर ((पौष्टिक भेळ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. माता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला संस्थेचे ज्येष्ठ सदस्य विठ्ठलराव मोरये यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये, उपाध्यक्ष दयानंद लोके, सचिव कृष्णा म्हसकर, सुनील आंबेरकर, गजानन रेवडेकर, श्रीधर मोरये, अजित कुडतरकर, मुख्याध्यापक सुधीर तांबे, प्रा. उज्ज्वला खेडकर, प्रा. स्वाती पाटील आदी उपस्थित होते. पाककला स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील ४० महिलांनी सहभाग घेतला. यात द्वितीय स्मिता भाट (उत्तपा), तृतीय क्रमांक उमा तायशेट्ये (पौष्टिक कटलेट) यांनी पटकावला. स्पर्धेचे परीक्षण फार्मसी कॉलेज प्रा. उज्वला खेडकर, प्रा. स्वाती पाटील यांनी केले. अमोल गावकर आणि साळसकर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन शिक्षिका शर्वरी सावंत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com