-चोरीला गेलेली कार काही तासांत हस्तगत

-चोरीला गेलेली कार काही तासांत हस्तगत
Published on

चोरीला गेलेली मोटारीचा शोध
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३१ ः शहरातील उदयनगर परिसरात भरवस्तीतून मोटार चोरीची धक्कादायक घटना घडली होती; मात्र दापोली पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयित कारवाईमुळे चोरीला गेलेली मोटार अवघ्या काही तासांत शोधून काढण्यात यश आले आहे.
उदयनगर येथील युगांत पार्क बी-विंगमध्ये राहणारे अनिल अनंत मोरे (वय ६०) यांनी मोटार २८ मार्चला रात्री घरासमोर पार्क केली होती; मात्र २९ मार्चला सकाळी सुमारे ९ वाजता पाहणी केली असता मोटार पार्किंगमधून गायब झाल्याचे निदर्शनास आले. गाडी न दिसल्याने मोरे यांनी परिसरात शोधाशोध करत शेजाऱ्यांकडे चौकशी केली; मात्र कोणताही मागमूस न लागल्याने त्यांनी तत्काळ दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्राथमिक तपासात चोरट्याने सुमारे ३ लाख रुपये किमतीची मोटार चोरी केल्याचे स्पष्ट झाले. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. फूटेजमध्ये दोन संशयित दुचाकीवर येताना दिसले. त्यापैकी एकाने पार्किंगमधून मोटार घेऊन पळ काढला तर दुसरा दुचाकीवरून त्याच्या मागे गेल्याचे स्पष्ट झाले. या महत्त्वाच्या धाग्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. काल (ता.३०) अलोरे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिरगाव परिसरात एक संशयास्पद मोटार बेवारस अवस्थेत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर हीच चोरीला गेलेली मोटार असल्याचे स्पष्ट झाले. मोटारमालक अनिल मोरे यांना बोलावून ओळख पटवण्यात आली व वाहन सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com