पावस- वायंगणी सडा येथे आरोग्य शिबिर

पावस- वायंगणी सडा येथे आरोग्य शिबिर
Published on

संपर्क युनिक फाउंडेशनतर्फे
वायंगणी सडा येथे आरोग्य शिबिर
पावस, ता. १ : ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात या सामाजिक भावनेतून संपर्क युनिक फाउंडेशनच्या वतीने वायंगणी सडा, शांतीनगर (पावस रोड) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला.
शिबिराच्या उद्घाटनानंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने नेत्र तपासणी, दंत चिकित्सा, रक्त तपासणी, मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या करण्यात आल्या. केवळ तपासणीच नव्हे, तर ज्या रुग्णांना गरज होती, त्यांना तत्काळ आवश्यक औषधांचे मोफत वाटपही करण्यात आले.
या उपक्रमाचे मुख्य नियोजन संस्थेचे सल्लागार सचिन शिंदे यांनी केले होते. शहरासोबतच ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची जनजागृती आणि सुविधा पोहोचाव्यात, या उद्देशाने संपर्क युनिक फाउंडेशनने ही आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर, जिल्हाध्यक्ष जमीर खलफे, सचिव युसुफ शिरगावकर आणि जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधत भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. या शिबिरामुळे वायंगणी सडा आणि परिसरातील शेकडो नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार मिळणे शक्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com