

34659
साहित्याशी नाते जोडणे ही काळाची गरज
राजेंद्रप्रसाद मसुरकर ; कोमसापच्या लांजा शाखेतर्फे कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १ ः ‘‘मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नव्या पिढीने साहित्याशी नाते जोडणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) लांजा शाखा आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित सभासद स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, लांजा शाखा अध्यक्ष रामचंद्र जाधव, प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण, शिक्षक नेते विनायक हातखंबकर, विजय बेर्डे, श्री. मापारी आदी उपस्थित होते. शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित कथाकथन, वक्तृत्व आणि काव्यलेखन स्पर्धांतील विजेत्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. माया तिरमारे, नेहा पाटोळे, अमोल जाधव, मृगया मोरे आणि तनुजा सरदेसाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी परीक्षक म्हणून योगदान देणाऱ्या डॉ. राजीव कांबळे, प्रदीप कदम, भीमराव खोत, कुमार गावडे, दिलीप चव्हाण, सविता पाटील व मृगया मोरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्ते राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी "अभिजात मराठी भाषा" या विषयावर मार्गदर्शन केले. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करत त्यांनी भाषेचे जतन करण्याची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली. अध्यक्षीय भाषणात आनंद शेलार यांनी लांजा शाखेच्या कार्याचे कौतुक करून ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळ अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
प्रकाश हरचेकर, रिया लिंगायत आणि बाळू नागरगोजे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. माया तिरमारे यांनी आभार मानले. या मेळाव्याला राजेश गोसावी, शहाजीराव देशमुख, प्रभाकर गवाणकर, मनीषा पाटील, नंदकुमार पाटोळे, अरुण वंजारे, श्री. लाड आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.