

34731
घरपोच गॅस वितरण तातडीने सुरू करा
बौद्ध महासभा ः प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ ः जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर वितरणात होत असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे घरपोच गॅस वितरण तत्काळ सुरू करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभा, सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
सध्या गॅस एजन्सीकडून घरपोच सेवा न देता थेट कार्यालयासमोरच सिलेंडर वाटप केले जात असल्याने ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. कडक उन्हात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, या परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यात गॅस सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात वितरण व्यवस्थेत त्रुटी असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित गॅस एजन्सींना तातडीने घरपोच वितरण सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदकुमार धामापूरकर, महासचिव प्रवीण कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.