वन कार्यालयाच्याच झाडांची कत्तल

वन कार्यालयाच्याच झाडांची कत्तल
Published on

34760

वन कार्यालयाच्याच झाडांची कत्तल

पर्यावरणप्रेमी संतप्त; विकासकामांसाठी वृक्षतोड

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.१ : येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरातील झाडे तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. वन विभागाच्या विकासकामांसाठी ही झाडे तोडल्याचे समजते. मात्र, या वृक्षतोडीमुळे काही जागरूक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा विषय शहरात चर्चेचा ठरला आहे. ‘‘विकासकामांच्या नावाखाली झाडांचे रक्षणकर्तेच जर झाडे तोडत असतील, तर दाद कोणाकडे मागायची?’’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील वन विभागाच्या परिसरात अनेक जुनी आणि मोठी झाडे आहेत. मुख्य इमारतीच्या पाठीमागील बागेजवळ (गार्डन) असलेली ही झाडे आज तोडण्यात आली. त्या ठिकाणी काही विकासकामे प्रस्तावित असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले. मात्र, हा प्रकार पर्यावरणप्रेमींना रुचलेला नाही. त्यांच्या मते, ‘‘सामान्य शेतकऱ्याला घरासाठी किंवा इतर कामांसाठी झाड तोडायचे असल्यास वन विभाग कायद्याचा बडगा दाखवतो. मग स्वतःच्या हद्दीत विकासकामांच्या नावाखाली झाडे तोडताना कायदा आड येत नाही का?’’ वृक्षप्रेमींनी याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
--------
कोट
दोन-तीन विकासकामांसाठी ही झाडे तोडली असून, त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून रितसर परवानगी घेतली आहे. येत्या एक-दोन दिवसांत ही झाडे का तोडली आणि कोणाची परवानगी घेतली, याची अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.
- मिलिश शर्मा, उपवनसंरक्ष, सावंतवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com