

swt26.jpg
34872
कुडाळ : पत्रकार परिषदेत बोलताना निलेश गुरव सोबत तुषार तळकटकर, तेजस मसके, रामचंद्र आईर, पुजा सावंत - उपळेकर. (छाया : अजय सावंत)
रिल्स मालवणी ग्रुपतर्फे
कुडाळात उद्या ‘अवॉर्ड शो’
कला सिंधु सन्मान पुरस्काराचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ः रिल्स मालवणी ग्रुपतर्फे शनिवारी (ता. ४ ) सायंकाळी ७ वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉलच्या सभागृहात मालवणी अवॉर्ड २०२६ या शो चे आयोजन केले आहे. यावेळी कला सिंधु सन्मान पुरस्काराने दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण व वर्षभरात मालवणी भाषेत उल्लेखनीय काम केलेल्या कलाकारांचा मालवणी अवॉर्ड पुरस्काराने सन्मान होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे, अशी माहिती रिल्स मालवणी ग्रुपचे अध्यक्ष तुषार तळकटकर व सदस्य निलेश गुरव यांनी दिली.
येथील मराठा समाज हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ४ एप्रिल हा मालवणी नाट्यसम्राट मच्छिंद्रनाथ कांबळी यांचा जन्मदिवस आहे. मालवणी भाषा दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याचे औचित्य साधून सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो! अशी टॅगलाईन घेऊन हा मालवणी अवार्ड शो आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. यावेळी मालवणी भाषेसाठी काम करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत, सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार, सर्वोत्कृष्ट मालवणी चित्रपट, सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट मालवणी कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालवणी वेबसीरीज, सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्यसंस्कृती, सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्ट फिल्म व सर्वोत्कृष्ट मालवणी रिल अशा कॅटेगरीतील कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोकण वाचवा या विषयावर रिल्स स्पर्धाही आयोजित केली आहे, अशी माहिती क्रिएटिव्ह हेड तेजस मसके यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर, रामचंद्र आईर, पुजा सावंत-उपळेकर, भावेश तळवलकर, उपेंद्र पवार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.