

वायरी येथे ११ एप्रिलला
‘सेमी शूटिंग व्हॉलीबॉल’
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ : वायरी येथील श्री देव भूतनाथ व्हॉलीबॉल संघातर्फे ११ एप्रिलला जिल्हास्तरीय व निमंत्रित संघांच्या सेमी शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. श्री देव भूतनाथ मंदिर नजीकच्या पटांगणावर सायंकाळी ६ वाजल्यापासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. विजेत्या संघांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. यात प्रथम ७,७७७ रुपये व चषक, द्वितीय ५,५५५ रुपये व चषक, तृतीय २,००० रुपये व चषक, चतुर्थ क्रमांक २,००० रुपये व चषक दिला जाणार आहे. वैयक्तिक कौशल्यासाठी उत्कृष्ट शूटर, उत्कृष्ट लिफ्टर, उत्कृष्ट नेटमन, उत्कृष्ट सर्व्हिसमन आणि शिस्तबद्ध संघ यांनाही विशेष आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. इच्छुकांनी नाव नोंदणी १० एप्रिलपर्यंत करणे अनिवार्य आहे. सर्व सहभागी संघांसाठी रात्री ११ वाजेपर्यंत जेवणाची सोय केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मयूर कोळंबकर, दीपक ढोलम, स्वप्नील केळुसकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री देव भूतनाथ व्हॉलीबॉल संघ वायरी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.