

swt210.jpg
34886
वेंगुर्ले : श्री विरासन हनुमान मंदिर येथे किशोर सोन्सूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली १० हजार जोर-बैठकांचा अभिषेक करताना व्यायामपटू आणि उपस्थित मान्यवर.
दहा हजार जोर बैठकांचा हनुमान चरणी अभिषेक
वेंगुर्लेत उपक्रम : स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ : ‘बजरंग बली की जय’, ‘जय हनुमान’च्या जयघोषात येथील श्री विरासन हनुमान मंदिर गाडी अड्डा येथे ‘व्यायाम प्रसार’ व ‘व्यसनमुक्त’ अभियानांतर्गत १० हजार जोर-बैठकांचा अभिषेक संकल्प पूर्ण करण्यात आला.
गाडी अड्डा मित्रमंडळ, विरासन हनुमान मंदिर व्यवस्थापन, श्री सातेरी व्यायामशाळा, युवक शरीरसौष्ठव संवर्धन संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ, भाविक यांच्यावतीने आज या उपक्रमाचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू किशोर सोन्सूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ६ ते ८ या वेळेत शक्तिदेवता हनुमान चरणी हा अनोखा व्यायाम अभिषेक अर्पण करण्यात आला. यावेळी व्यायामपटू, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
"प्रत्येक विद्यार्थी व भाविकाने आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष द्यावे, शरीर मजबूत व निरोगी बनवावे," असा संदेश देत व्यसनमुक्तीचा संकल्प यावेळी करण्यात आला. पारंपरिक आरतीनंतर या उपक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये येथील ''वेंगा बॉईज''चे सदस्य, स्थानिक व्यायामपटू आणि ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला.
राष्ट्रीय पंच किशोर सोन्सूरकर यांनी उपस्थितांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले आणि वॉर्मअपचे प्रशिक्षण देत योग्य पद्धतीने जोर-बैठका कशा माराव्यात, याचे मार्गदर्शन केले. सहभागी भाविकांनी एका तासात आपल्या क्षमतेनुसार जोर-बैठका काढल्या. विशेष म्हणजे, यावर्षी पुरुषांच्या बरोबरीने महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
याप्रसंगी पत्रकार शेखर सामंत, डॉ. राजेश्वर उबाळे, डॉ. किशोर धोंड, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, रोटरी अध्यक्ष आनंद बोवलेकर, ''माझा वेंगुर्ला''चे राजन गावडे, वसंत तांडेल, पत्रकार सुरेश कौलगेकर, बाळा फोवकांडे, नागेश केळजी, सुहास मांजरेकर, केळजी मामा, नित्यानंद आठलेकर, ज्येष्ठ व्यायामपटू महेश वेंगुर्लेकर, प्रकाश प्रभूखानोलकर, शिवदत्त सावंत, पूनम बोवलेकर, संगीता कामत, प्रसाद जाधव, शिल्पा सापळे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.