

swt213.jpg
4904
डॉ. जयेंद्र परुळेकर
सावंतवाडीतील ''ती'' वृक्षतोड संशयास्पद
डॉ. जयेंद्र परुळेकर : वन कार्यालय वृक्षतोडप्रकरणी टीका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ : ज्यांच्यावर जिल्ह्यातील वृक्ष, वने आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, त्यांच्याच निवास व कार्यालय परिसरात विकासकामांच्या नावाखाली अनेक वर्षे जपलेल्या मोठ्या वृक्षांची कत्तल होणे हे केवळ आश्चर्यकारकच नाही, तर अत्यंत संशयास्पद आहे. असा कोणता मोठा ''विकास'' आहे, ज्यासाठी हे वृक्ष जमीनदोस्त करण्यात आले0 विकासनिधी खर्च करण्यासाठी थातूरमातूर कारणे देऊन वृक्षांचा बळी देणे हे संरक्षकच भक्षक झाल्याचे लक्षण आहे, अशा जळजळीत शब्दांत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सावंतवाडी वनविभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
श्री. परुळेकर यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, २२ मार्च २०२५ ला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील निसर्ग संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक ''टास्क फोर्स'' नेमण्यात आली आहे. या समितीचे अत्यंत महत्त्वाचे सदस्य खुद्द उपवनसंरक्षक आहेत. संपूर्ण दोडामार्ग आणि सावंतवाडीतील १३ इको-सेन्सिटिव्ह गावांत वृक्षतोडीवर कडक बंदी असताना, टास्क फोर्स सदस्याच्याच कार्यालयात कुऱ्हाड चालल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. "सरमळे, कोलझर यांसारख्या अतिसंवेदनशील गावांमध्ये बेसुमार वृक्षतोड नक्की का आणि कशी होते0 याचे उत्तर कदाचित उपवनसंरक्षक कार्यालय परिसरात झालेल्या या वृक्षतोडीमध्येच दडलेले असावे." निसर्ग जपणाऱ्या विभागाकडूनच असे कृत्य होत असल्याने आता जनतेने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की,"विकास'' नावाचा आजार झालेल्या भस्मासुरांना निसर्ग संपूर्णपणे संपवल्याशिवाय शांती लाभणार नाही, हेच आजचे वास्तव आहे. प्रशासकीय निधीचा वापर निसर्गाचा बळी देऊन करणे हे निषेधार्ह आहे." या गंभीर प्रकारानंतर आता पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले असून, ''टास्क फोर्स''चे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.