हनुमान जन्मोत्सव देवगडमध्ये उत्साहात

हनुमान जन्मोत्सव देवगडमध्ये उत्साहात
Published on

हनुमान जन्मोत्सव
देवगडमध्ये उत्साहात
देवगडः तालुक्यात ठिकठिकाणी हनुमान जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच विविध मंदिरांत भजन-कीर्तनाचा आवाज घुमत होता. दिवसभरात भाविक सतत दर्शनासाठी मंदिरात येत होते. येथील किल्ला मारुती मंदिर, बाजारपेठेतील मंदिर तसेच बसस्थानकातील मारुती मंदिरात जन्मोत्सव साजरा झाला. तसेच जामसंडे परिसर आणि वाडातर, मळई यांसह तालुक्यातील इतर विविध ठिकाणच्या मंदिरांत उत्सव साजरा झाला. येथील बाजारपेठेतील मारुती मंदिरात मधुकर गोगटे यांचे कीर्तन झाले. त्यांना संजय गोगटे यांनी हार्मोनियम तर दत्तात्रय किरकिरे यांनी तबला साथ केली. यावेळी महिलांसह मोठी गर्दी झाली होती. विविध मंदिरात पहाटेपासून भाविक कीर्तनासाठी जमले होते. यामध्ये महिलांचाही सहभाग मोठा होता. ठिकठिकाणी उत्साही वातावरणात उत्सव साजरा झाला. उत्सवासाठी गर्दी झाल्याचे चित्र होते. काही ठिकाणी दुपारी महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. महाप्रसादासाठीही भाविकांची गर्दी होती. दरम्यान, हनुमान जयंती उत्सवानिमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com