राजापूर-ग्रामरोजगार सहाय्यकांसाठी फेस ऑथेंटिकेशन रद्द करा

राजापूर-ग्रामरोजगार सहाय्यकांसाठी फेस ऑथेंटिकेशन रद्द करा
Published on

-rat२p१६.jpg-
26O34986
राजापूर ः सभापती नंदिनी कदम यांना निवेदन देताना रत्नागिरी जिल्हा ग्रामरोजगार सल्लागार साहाय्यक संघटनेचे गोपाळ गोंडाळ, संदीप तावडे आणि पदाधिकारी.
---
‘फेस ऑथेंटिकेशन’ रद्द करा
ग्रामरोजगार साहाय्यकांचे निवेदन; सोमवारपासून कामबंद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः अ‍ॅग्रीस्टीक, जीओ टॅगिंग, ई-केवायसी, पीकपाणीसारखी शासकीय कामे ग्रामरोजगार सहाय्यकांकडून विनामोबदला केली जात आहेत. त्यामध्ये आता वैयक्तिक लाभार्थी कामांसाठी लागू केलेली फेस ऑथेंटिकेशन प्रणालीची भर पडली आहे. त्यामुळे ग्रामरोजगार सहाय्यकाच्या कामाची जोखीम अन् ताण वाढणार आहे. त्यामुळे फेस ऑथेंटिकेशन प्रणाली तत्काळ रद्द करावी, अशी मागणी ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेने पंचायत समितीच्या सभापती नंदिनी कदम, तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांना निवेदन दिले. याबाबत योग्य निर्णय न झाल्यास ६ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामरोजगार सहाय्यक संघटना राजापूरचे अध्यक्ष मनीष करंगुटकर यांच्या नेतृत्वाखाली सचिव संदीप तावडे, रत्नागिरी जिल्हा ग्रामरोजगार सल्लागार साहाय्यक संघटनेचे गोपाळ गोंडाळ आदींनी हे निवेदन दिले.
अ‍ॅग्रीस्टीक, जीओ टॅगिंग, ई-केवायसी, पीकपाणीसारखी शासकीय कामे ग्रामरोजगार सहाय्यकांकडून विनामोबदला केली जात आहेत. ऑनलाईन कामांसाठी लागणारा इंटरनेट डाटासाठी लागणारा खर्चही स्वतःची पदरमोड करून केली जात आहे. ही कामे जोखमीची आणि तणावाची असतानाही ग्रामरोजगार सहाय्यकांना कोणतेही सुरक्षाकवच नाही. ही सारी कामे करताना होणारी कुटुंबाची आर्थिक ओढाताण सहन करत असताना त्यामध्ये आता वैयक्तिक लाभार्थी कामांसाठी लागू केलेली फेस ऑथेंटिकेशन प्रणाली या कामाची भर पडली आहे. वैयक्तिक लाभार्थी कामांसाठी लागू केलेली फेस ऑथेंटिकेशन प्रणालीमध्ये विशेषकरून फळलागवडीची कामे केली जात आहेत. या कामांसाठी फारशा सोयीसुविधा नसलेल्या ग्रामीण भागासह डोंगरदर्‍यातून भटकंती करत ग्रामरोजगाराला सहाय्यकाला कामे करावी लागत आहेत. या साऱ्यांचा विचार करून फेस ऑथेंटिकेशन रद्द करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com