

कामथे येथे भगवान महावीर जयंती महोत्सव
चिपळूण, ता. २ ः चिपळूण तालुका दिगंबर जैन समाजोन्नती मंडळातर्फे कामथे येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव दिगंबर जैन मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महोत्सवदिनी सकाळी साडेसात वाजता महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे यजमान मधुरा व मोहन नरोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर मुलनायक श्री १००८ अभिनंदननाथ भगवान पंचामृत अभिषेक - तन्वी व चेतन पाटील, शिखरस्त १००८ मुनिसुव्रतनाथ भगवान पंचामृत अभिषेक सुषमा व भारत आवटी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर भगवान महावीर जन्म कल्याणक सोहळा झाला. या प्रसंगी लहान मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. मंडळाचे माजी अध्यक्ष शशिकांत दगडू मोहिरे यांनी सलग २० वर्षे मंडळाचे अध्यक्षपद सांभाळल्याबद्दल त्यांना रत्नागिरी भूषण सन्मानपत्र संस्थेचे अध्यक्ष वसंत साळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सचिव श्रीकांत धने यांनी केलेल्या कामाबद्दल धर्मनिष्ठा गौरवभूषण सन्मानपत्र देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला. मंडळाने बांधलेल्या सभागृहाच्या सुशोभीकरणासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.