वैभव पारकर यांना ‘इंडिया एक्सेलन्स’

वैभव पारकर यांना
‘इंडिया एक्सेलन्स’
Published on

35169

वैभव पारकर यांना
‘इंडिया एक्सेलन्स’
ओटवणे, ता. ३ ः येथील युवा जादूगार वैभव पारकर (जादूगार वैभवकुमार) यांना पुणे येथील प्रतिष्ठित संस्थेने ‘आर्ट बिट्स इंडिया एक्सेलन्स अवॉर्ड्स’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित केले. कला व मनोरंजन विभागात कोकणातील उत्कृष्ट जादूगार म्हणून त्यांची निवड करण्यात आली. जादूगार वैभव कुमार यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक जादू आणि आधुनिक स्टेज प्रेझेंटेशन यांचा उत्कृष्ट संगम साधत त्यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. या कलेचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक प्रबोधनासाठीही केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी शेकडो प्रयोग सादर करून जनजागृती केली आहे. त्यांच्या या यशाने सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com