हर्डीच्या सान्वी जड्यार ठरल्या मेगा पैठणीच्या मानकरी

हर्डीच्या सान्वी जड्यार ठरल्या मेगा पैठणीच्या मानकरी
Published on

-rat३p१८.jpg-
P26O35154
राजापूर ः होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या महिलांसमवेत नगराध्यक्षा अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे.
-----------
सान्वी जड्यार मेगा पैठणीच्या मानकरी
राजापूर नगरपालिका; सारिका ढोले द्वितीय, सोनाली नाईक तृतीय
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः राजापूर नगरपालिकेच्या १५०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत हर्डी येथील सान्वी जड्यार यांनी प्रथम क्रमांक पटकावत मेगा पैठणीच्या मानकरी ठरल्या. सारिका ढोले, कोदवली यांनी द्वितीय क्रमांक पटकावत सेमी पैठणी आणि खडपेवाडीतील सोनाली नाईक यांनी तृतीय क्रमांक पटकावत पैठणी पटकावली.
संगीता खडपे, खडपेवाडी व माया भेडसे, कोदवली यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांना पैठणी देऊन गौरवण्यात आले.
शहरातील जवाहरचौक येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, तहसीलदार विकास गंबरे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, विरोधी गटनेते अ‍ॅड. राहुल तांबे, गटनेते अ‍ॅड. जमीर खलिफे, महिला व बालकल्याण सभापती शबाना मुल्ला आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com