विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन

विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन
Published on

पंचायत समितीच्या लिपिकाचे
विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ३ : जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत संशयित हर्षल सुभाष गवंडी (वय २६) याला ताब्यात घेतले आहे. संशयित एका पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत आहे.
बुधवारी सकाळी ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी संगणकवर्ग संपवून एसटीने घरी जाण्यास निघाल्या. त्या बसथांब्यावर उतरून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर दुचाकी थांबवून या विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला. त्यामुळे संशयित घटनास्थळावरून पळून गेला.
विद्यार्थिनींनी घरी जाऊन पालकांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी काल (ता.२) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक उदय झावरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com