

O35317
देवगड ः येथे शनिवारी बाळ माने यांचे स्वागत करताना आंबा बागायतदार संघटनेचे सुशांत नाईक, काका ढोके, प्रशांत शिंदे आदी.
बागायतदारांचा ‘चलो मुंबई’ नारा
बाळ माने : लवकरच पुढील भूमिका ठरणार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः आंबा आणि काजू बागायतदारांमधील अडचणीच्या उद्रेकातून शेतकरी रस्त्यावर उतरला; मात्र तुटपूंजी मदत जाहीर करून राज्य शासनाने तोंडाला पाने पुसली. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुढील भूमिका ठरवून रत्नागिरी, सिंधुदुर्गातील बागायतदारांतर्फे ‘चलो मुंबई’चा नारा देण्यात येईल, असे माजी आमदार बाळ माने यांनी आज येथे सांगितले. अराजकीय विषयातून कोकणातील शेतकरी संघटित झाला आहे. त्यामुळे सरकारनेही राजकीय चष्म्यातून याकडे पाहू नये, असेही ते म्हणाले.
माने यांनी ठाकरेगट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, आंबा बागायतदार आणि व्यापारी संघाचे अध्यक्ष आनंद ऊर्फ काका ढोके, प्रशांत शिंदे, चंदन मामघाडी, गणेश गावकर, उत्तम भडसाळे, तुषार पाळेकर आदींशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत वाशीमध्ये व्यापारी आणि बागायतदारांची बैठक झाली. यापुढे कोल्हापूर, पुणे भागातील बाजार समित्यांशी चर्चा केली जाईल. हापूस उत्पादन घटल्याने केवळ शेतकरीच नाही तर किटकनाशके, पॅकिंग साहित्य विक्रेते, वाहतूक व्यावसायिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. निर्यात ठप्प झाल्याने आंबा दरावरही परिणाम झाला. एकूणच शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे.’’
श्री. नाईक म्हणाले, ‘‘प्रतिझाड २२० रूपये मदत म्हणजे बागायतदारांची चेष्टा आहे. लवकरच पुणे येथे किटकनाशके कंपनी प्रतिनिधींसोबत बैठक होईल. पालकमंत्र्यांनी ओरोस मोर्चावेळी बागायतदारांना रस्त्यावर उतरावे लागणार नाही, असे आश्वासन दिले; मात्र, तुटपुंजी मदत जाहीर झाली, हे दुःख आहेच.’’
चौकट
‘शक्तिपीठ’मधून कोणाची समृद्धी?
मुख्यमंत्र्यांनी आंबा, काजू बागायतदारांच्या शिष्टमंडळाला बोलावून चर्चा केली पाहिजे होती. सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही; परंतु समृध्दी, शक्तिपीठ महामार्गांसाठी पैसा आहे. यातून कोणाची समृध्दी झाली, असा खोचक सवालही माने यांनी केला. डिझेलचे चढे दर, पेट्रोल पंपावर डिझेल घेताना निर्बंध यातून ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी अवस्था कोकणातील मच्छीमारांची झाल्याची टीकाही माने यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.