

35352
मुंबई-गोवा महामार्गाला विलंब
तानावडे; रखडलेल्या कामांवर बोट
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ : राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व श्रेणीसुधारणा प्रकल्पातील सततच्या विलंबाबद्दल राज्यसभेत गंभीर चिंता व्यक्त केली.
शून्य प्रहरादरम्यान बोलताना तानावडे यांनी सांगितले की, मुंबई आणि गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ६६ हा कोकण प्रदेशासाठी जीवनरेखा असून, पर्यटन, व्यापार, मालवाहतूक आणि प्रादेशिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या महामार्गाच्या चार पदरीकरणाचा प्रकल्प एक दशकापूर्वी मंजूर झाला होता. त्याचा उद्देश प्रवाशांची कनेक्टिव्हिटी सुधारणे, रस्ते सुरक्षा वाढवणे आणि प्रवासाचा कालावधी कमी करणे हा होता. मात्र, भूसंपादनातील अडचणी, पर्यावरणीय मंजुरीतील विलंब, आराखड्यातील बदल, कंत्राटदारांशी संबंधित समस्या आणि वाहतूक व्यवस्थापनातील अडचणींमुळे प्रकल्पाची गती मंदावल्याचे त्यांनी नमूद केले. परिणामी अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून, वाहतूक कोंडी, अपूर्ण पूल आणि खराब रस्त्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनते, असेही त्यांनी अधोरेखित केले. मुसळधार पावसामुळे अपूर्ण रस्त्यांची अवस्था अधिकच खालावते, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो आणि वाहतूक कोंडी तीव्र होते. महामार्गाचे सामरिक व आर्थिक महत्त्व लक्षात घेता, तसेच पावसाळा जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर, तानावडे यांनी केंद्र सरकारला उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्पष्ट कालमर्यादा जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.