राजापूर ग्रामीण रुग्णालय होणार ''उपजिल्हा रुग्णालय''

राजापूर ग्रामीण रुग्णालय होणार ''उपजिल्हा रुग्णालय''
Published on

rat5p4.jpg
35483
राजापूर ः रक्त साठवणूक केंद्राच्या उद्घाटनरप्रसंगी बोलताना आमदार किरण सामंत. यावेळी उपस्थित मान्यवर.

राजापूर ग्रामीण रुग्णालयास ‘उपजिल्हा’ दर्जा
आमदार किरण सामंतः रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ : "राजापूर तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देणे आणि प्रलंबित ''मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल''चा प्रश्न मार्गी लावणे याला आपले प्राधान्य असेल," असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला. राजापूर ग्रामीण रुग्णालयातील नूतन ''रक्त साठवणूक केंद्राच्या'' उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या सोहळ्याला पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लोकरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सामंत म्हणाले, "रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याने भविष्यात जिल्ह्याला डॉक्टरांची कमतरता भासणार नाही. तसेच, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती आणि कर्मचारी निवासस्थानांच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्यासोबत येत्या दोन दिवसांत होणाऱ्या विशेष बैठकीत तालुक्यातील आरोग्य सुविधांशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील."
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले.

चौकट
१०८ रुग्णवाहिका कोल्हापूरसाठीही द्यावी
सध्या १०८ रुग्णवाहिकेला केवळ रत्नागिरीपर्यंत रुग्ण नेण्याची परवानगी आहे. मात्र, आपत्कालीन स्थितीत रुग्णाला कोल्हापूरला हलवावे लागल्यास रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही, ज्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही सेवा कोल्हापूरसाठीही सुरू करावी," अशी महत्त्वाची मागणी उपसभापती अभिजित गुरव यांनी यावेळी केली. तसेच, आमदार किरण सामंत यांच्यामुळे राजापूर मतदारसंघाला राज्यात सर्वाधिक निधी मिळाला असून तालुक्याचा विकास वेगाने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com