रत्नागिरी ः वरवडे-भंडारवाडा येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात

रत्नागिरी ः वरवडे-भंडारवाडा येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात
Published on

rat5p3.jpg
35434
रत्नागिरी ः वरवडे-भंडारवाडी येथे हनुमान जन्मोत्सवात कीर्तन सादर करताना प्रसन्नराज जोशी. सोबत तबलासाथ प्रसाद वैद्य व संवादिनीवर संतोष गोडबोले.

वरवडे-भंडारवाडा येथे
हनुमान जन्मोत्सव उत्साहात
रत्नागिरी, ता. ५ : तालुक्यातील वरवडे-भंडारवाडा येथील मयेकर परिवार आणि ग्रामस्थांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसिद्ध कीर्तनकार प्रसन्नराज जोशी (रत्नागिरी) यांच्या लळिताच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता झाली.
पहाटे हनुमंताच्या जन्मोत्सवाच्या कीर्तनाने उत्सवास सुरुवात झाली. तीन दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमांना वरवडे गावातील ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. गुरुवारी (ता. २) लळिताच्या कीर्तनाने या उत्सवाचा समारोप झाला. या उत्सवातील जन्मोत्सव आणि लळिताच्या कीर्तनास देवरूखचे प्रसाद वैद्य यांनी तबल्यावर, तर संतोष गोडबोले यांनी संवादिनीवर (हार्मोनियम) उत्तम साथसंगत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com