

35472
‘सन्मान सैनिकांचा, अभिमान गावाचा’
आयनोडेत सत्कार सोहळा; देशरक्षणातील योगदानाबद्दल कृतज्ञता
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३ : आयनोडे पुनर्वसित गावात श्री देव भूतनाथ सातेरी पंचायतन देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘सन्मान सैनिकांचा, अभिमान आमच्या गावाचा’ या अभिनव उपक्रमांतर्गत गावातील माजी सैनिकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. देशसेवेसाठी आयुष्याचा महत्त्वाचा कालावधी अर्पण केलेल्या वीरांना गावकऱ्यांनी कृतज्ञतेने सलाम करत त्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात सेवा बजावून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यात शंकर भद्रिके, महादेव सावंत, सत्यवान नाईक, कृष्णा ठाकूर, उदय सावंत, रामचंद्र सावंत, रामदास चौगुले, हरिभाऊ देसाई, मिलिंद सावंत, चंद्रकांत आयनोडकर, अभिजित ठाकूर, राजन सावंत, नारायण ठाकूर, नीलेश सावंत, भिकाजी घुमे यांना गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सैनिकांचे कार्य गौरवताना, देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गावासाठी ही अभिमानाची बाब असून पुढील पिढीनेही या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.
सोहळ्यास विश्वस्त विलास सावंत, हर्षद सावंत, विष्णू सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, उपाध्यक्ष प्रदीप देसाई, सचिव अरुण सावंत, सदस्य नीलेश सावंत, सदाशिव आयनोडकर, बालानंद देसाई, उदय सावंत, कृष्णा ठाकूर, रामचंद्र सावंत, नारायण सुतार, डेमा आयनोडकर, शिक्षण विभागातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी लक्ष्मण सावंत, प्रमोद देसाई, आनंद ठाकूर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयनोडे गावात पार पडलेला हा सोहळा देशभक्तीची भावना जागवणारा व सैनिकांविषयी आदर व्यक्त करणारा ठरला. प्रदीप देसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन सावंत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.