

भाजप स्थापनादिनानिमित्त
आजपासून विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः ‘‘भाजप स्थापना दिनानिमित्त ६ ते १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत विविध उपक्रम आयोजित केले आहेत. कमळ चिन्ह आणि देशाचे संविधान घराघरांत, मनामनांत रुजविणार आहोत,’’ अशी माहिती स्थानिक नेते विशाल परब यांनी दिली.
‘‘भाजपचा स्थापना दिन उद्या (ता. ६) आहे. यानिमित्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भाजपचा ध्वज फडकवण्यात येणार आहे. पक्षाची ध्येयधोरणे, विचारधारा, सर्व नेत्यांची जनतेशी असलेली नाळ, त्यांच्या कार्याने मिळालेली लोकप्रियता, भाजप सरकारची राज्य आणि केंद्रातील यशस्वी ध्येयधोरणे घराघरांत पोहोचविण्यात येणार आहे,’’ असे परब यांनी सांगितले.
उद्या पक्षाच्या संपर्क, तसेच मंडळ कार्यालयावर ध्वजवंदन, नागरिकांसाठी मिठाई वाटप, रुग्णांना फळवाटप करण्यात येईल. पक्षाच्या ध्येयधोरणांचे वाचन करण्यात येईल. अभिवादन रॅलीतून सावंतवाडी मतदारसंघातील महापुरुषांना अभिवादन करण्यात येणार आहे. राजवाडा परिसर, तसेच मतदारसंघातील प्रमुख चौकांमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच अन्य महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी शिबिरे, नागरिकांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येतील. पर्यटनस्थळे, हॉस्पिटल परिसर, वेंगुर्ले येथील समुद्रकिनारे, मोती तलावाचा परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. येथील भाजप संपर्क कार्यालयात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा होईल. तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. दशावतारासह विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. येथील भाजप संपर्क कार्यालयात ‘मी भाजपचा-भाजप माझा’ या थीमवर आधारित ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्यात येणार आहे. तसेच १४ एप्रिलला संविधान वाचन कार्यक्रम भाजप कार्यालयात घेण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.