मेढा येथे १३ पासून वर्धापन दिन सोहळा

मेढा येथे १३ पासून 
वर्धापन दिन सोहळा
Published on

मेढा येथे १३ पासून
वर्धापन दिन सोहळा
मालवण : मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा १३ व १४ एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १३ ला सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत धार्मिक विधी, त्रिशक्ती होमहवन, सायंकाळी ५ वाजता श्री देवी सातेरी प्रसादिक भजन मंडळ, कांदळगाव-देऊळवाडी यांचे भजन, ७ वाजता पारंपरिक आरती, रात्री ८ वाजता शंकर मंदिर मेढा मालवण महिला मंडळ प्रस्तुत ‘रंगमेळा’ कार्यक्रम आहे. १४ ला सकाळी दहा ते दुपारी १ या वेळेत सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६.३० दरम्यान हळदीकुंकू समारंभ, अष्टपैलू कलानिकेतन यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम, ६.३० वाजता पारंपरिक आरती, रात्री ८ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण-वेंगुर्ले यांचा ‘गजमुख विघ्नेश्वर’ हा पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
---
कलंबिस्तला आज
विद्यार्थी गुणगौरव
सावंतवाडी : कलंबिस्त हायस्कूलमध्ये उद्या (ता. ६) सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम होणार आहे. दिवाळी सुटीत विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तक वाचन करून त्याद्वारे निबंध, कथालेखन केले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्रीधर पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, सरपंच सपना सावंत, संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, आधार सेवा संघटना जिल्हाध्यक्ष सुनील खरात, तालुकाध्यक्ष प्रमोद नाईक आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक अभिजित जाधव यांनी केले आहे.
-------------------
पॉवरलिफ्टिंग स्पर्धेस
वेंगुर्ले येथे प्रतिसाद
वेंगुर्ले ः हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून येथील नाईक जिम अँड फिटनेस सेंटर येथे जिम मर्यादित पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. युवासेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. नगरसेविका मयुरी केरकर यांनी हनुमानमूर्तीचे पूजन केले. यावेळी प्रदीप वेंगुर्लेकर, गोपाळ नार्वेकर, अमित नाईक, ईश्वर माने, डॉ. सचिन भांडे, दीपाली नाईक, राहुल मोर्डेकर, विशाल चेंदवणकर, अवधूत नाईक, सोहम पेडणेकर, किरण मेस्त्री, उज्वल गडेकर, जयेश गावडे, पार्थ वेंगुर्लेकर, राजन प्रजापती, निहार नवार, साईराज मातोंडकर आदी उपस्थित होते.
.....................
हडी येथे २६ पासून
सिंधुदुर्ग प्रीमियर लीग
मालवण : हडी गावातर्फे ‘सिंधुदुर्ग प्रीमियर लीग-२०२६’ या डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २६ ते ३० एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत हडी येथील कालिका मंदिरनजीक परिसरात रंगणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम १ लाख व आकर्षक चषक, तर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ५० हजार व आकर्षक चषक, तसेच वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. संघ नोंदणीकरिता ओंकार गावकर, जगदीश गावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
----
बांदा काळसेवाडीत
आज धार्मिक कार्यक्रम
बांदा : श्री देव बनखनकर देवस्थान काळसेवाडी, बांदा येथे उद्या (ता. ६) सकाळी ९ वाजता वार्षिक सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. दुपारी १२ वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता बांदा येथील महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता साटेली येथील माऊली भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com