

कीटकनाशकात भेसळ होत असल्याचे उघड
गुरुवारी पुण्यात बैठक ; आंबा बागायतदार आक्रमक
रत्नागिरी, ता. ५ : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना काही कीटकनाशक कंपन्या व त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांनी चुकीची किंवा भेसळयुक्त औषधे देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या औषध कंपन्यांनी मनमानी दर लावून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत असून, संबंधितांवर कडक कारवाई आणि नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ९ एप्रिलला दुपारी १२ वाजता पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित केली आहे.
कोकणातील आंबा बागायतदार सध्या अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत अनेक औषध कंपन्या रोखीने खते व कीटकनाशके घेतल्यास ‘एमआरपी’ किमतीवर ५० टक्के सवलत देऊन विक्री करत आहेत. यातून स्थानिक दुकानदार आणि कंपन्या प्रचंड नफा कमवत असून सामान्य शेतकऱ्यांची मात्र आर्थिक पिळवणूक होत आहे.
सद्यस्थितीत शेकडो कंपन्यांकडून कोकणात औषध पुरवठा केला जात आहे. या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी, कोकण विभागीय कृषी सहसंचालक, तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला माजी आमदार बाळ माने, आमदार वैभव नाईक, तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.