

35572
महोत्सवांमुळे ग्रामीण संस्कृतीला बळ
दीपक केसरकर ः ‘निरवडे महोत्सवा’त कलाविष्कारांना प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ : महापुरुष कला, क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा महोत्सवांमुळे ग्रामीण संस्कृतीला बळकटी मिळते, असे प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले. त्यांनी ‘निरवडे महोत्सव २०२६’ला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला, क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘निरवडे महोत्सव २०२६’ उत्साहात आणि दिमाखात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावत ग्रामीण भागातील या कलाविष्काराचे आणि मंडळाच्या भव्य नियोजनाचे कौतुक केले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर होते. व्यासपीठावर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, तळवडे जिल्हा परिषद अध्यक्ष संदीप गावडे, सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, माजी सभापती पंकज पेडणेकर, दादा परब, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, महेंद्र गावडे आदी उपस्थित होते.
श्री. परब यांनी, निरवडेसारख्या ग्रामीण भागात एवढा मोठा ‘शिवधनुष्य’ पेलणे सोपे काम नाही, अशा शब्दांत मंडळाचे कौतुक केले. निरवडे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर नागेश आडगावकर यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाने पूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. ओंकार कला मंच, सिंधुदुर्ग यांचा नृत्य नाट्य आणि कलाविष्काराचा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, मधुकर देसाई, शरद धाऊस्कर, हेमंत मराठे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, विनायक गावस, भुवन नाईक, प्रणव तारी आणि डॉ. अक्षय मिसाळ यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘लकी ड्रॉ’ विजेत्यांना गौरविले. सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष निखिल माळकर, सचिव संदेश पोपकर, खजिनदार सुनील माळकर, मार्गदर्शक ओमप्रकाश तिवरेकर व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आभार ओमप्रकाश तिवरेकर यांनी मानले.
---
दोन दिवसांचा सोहळा थाटात
पहिल्या दिवशी निरवडे गावातील महिला बचतगटांचा विशेष सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे रजुल पाटणकर, पत्रकार अमोल टेंबकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, पुणे येथील ख्यातनाम शास्त्रीय गायक नागेश आडगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, प्रकाश परब फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज परब, संगीत अलंकार दीप्तेश मेस्त्री, संगीत विशारद रूपेंद्र परब यांच्या उपस्थितीत दुसऱ्या सत्राचा प्रारंभ झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.