बीटबॉक्सिंग कला शिकण्यासाठी मालवणात १५ ला कार्यशाळा

बीटबॉक्सिंग कला शिकण्यासाठी मालवणात १५ ला कार्यशाळा
Published on

‘बीटबॉक्सिंग’ कला शिकण्यासाठी
मालवणात १५ ला कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : कोणत्याही वाद्याशिवाय केवळ तोंड, ओठ आणि आवाजाच्या जोरावर संगीताची जादू निर्माण करणारी ‘बीटबॉक्सिंग’ ही कला आता मालवणच्या तरुणाईला शिकता येणार आहे. मुंबईतील पहिली महिला ‘बीटबॉक्सर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मूळच्या वडाचा पाट गावच्या सुपुत्री साधना तावडे यांच्या विशेष कार्यशाळेचे १५ एप्रिल रोजी आयोजन बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे केले आहे.
‘बीटबॉक्सिंग’ म्हणजे मानवी आवाजाच्या माध्यमातून ड्रम बीट्स आणि विविध वाद्यांचे ताल तयार करण्याची कला. स्वतःला ‘ह्युमन ड्रम मशीन’ म्हणून सिद्ध करणाऱ्या या कलेसाठी कोणत्याही महागड्या वाद्यांची गरज नसते. जागतिक स्तरावर या कलेला मोठी मागणी असून करिअरचा एक नवा आणि ग्लॅमरस पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे.
साधना तावडे यांनी मुंबईत शिक्षण घेत असताना या कलेत प्रावीण्य मिळवले. ‘हक से हिंदुस्तान’ आणि ‘स्पॉटिफाय रॅप ९१’सारख्या प्रतिष्ठित मंचावर त्यांनी आपली कला सादर केली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या दहा महिला ‘बीटबॉक्सर्स’मध्ये त्यांचा दुसरा क्रमांक लागतो. आपल्या मातीतील गुणवंत मुलांना या कलेची ओळख व्हावी आणि त्यातून रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतात, याचे मार्गदर्शन त्या या कार्यशाळेत करणार आहेत. ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य आहे. मालवण आणि सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सेवांगण’तर्फे करण्यात आले आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे संजय आचरेकर, डॉ. सुमेधा नाईक, लक्ष्मीकांत खोबरेकर यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com