

- rat६p७.jpg-
P26O35663
साखरपा : केदार टेमकर यांची प्रथम पारितोषिक विजेते रांगोळी.
रांगोळी स्पर्धेत केदार टेमकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ६ : देवरूखमधील राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत केदार टेमकर यांना प्रथम पारितोषिक मिळवले आहे. ही स्पर्धा जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या देवरूख केंद्रातर्फे आयोजित करण्यात आली होती.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या देवरूख केंद्राच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा पार पडली. संस्थापक नीलेश भाऊसाहेब सांबरे यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेला राज्यभरातील कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील केदार टेमकर याने आपल्या अप्रतिम कलाकृतीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. युद्धाच्या झळांनी होरपळणारी यंत्रणा आणि इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर वास्तववादी संदेश देणारी रांगोळी साकारत केदारने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या कलाकृतीस प्रथम क्रमांकाचे १० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. द्वितीय पारितोषिक देवरूख येथील रांगोळीकार विलास रहाटे यांना तर तृतीय पारितोषिक कर्जत रायगडच्या मनोज चव्हाण यांनी पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिके अभिषेक सुतार (भांडुप, मुंबई), अक्षय वहाळकर (देवरूख, रत्नागिरी) आणि गौरव सुर्वे (रत्नागिरी) यांना देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.