लोकशाही दिनातील अर्ज लवकर मार्गी लावा

लोकशाही दिनातील अर्ज लवकर मार्गी लावा
Published on

- rat६p११.jpg-
२६O३५६७६
रत्नागिरी ः लोकशाही दिनातील तक्रारींचा आढावा घेताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल. सोबत विविध विभागांचे सर्व अधिकारी.
---
प्रलंबित अर्ज तत्काळ निकाली काढा
मनुज जिंदल ः वनजमिनींवर काम करणाऱ्यांवर कारवाई करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांसह चालू अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत. वनजमिनींवर जर कोणी काम करत असेल तर वनविभागाने सतर्क राहून अशांवर तत्काळ कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे, पोलिस उपअधीक्षक राधिका फडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी जिंदल यांनी मागील प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. नव्याने दाखल अर्जांबाबत काय कार्यवाही केली याबाबतही संबंधित विभागाने अहवाल देण्याबाबत सांगितले. प्रलंबित अर्ज तसेच लोकशाही दिनात येणारे अर्ज तत्काळ मार्गी लावावेत. त्याबाबतचा अहवाल आठवडाभरात द्यावा. जिल्हा परिषद, बांधकाम विभागाने आलेल्या अर्जाबाबत योग्य प्रक्रिया राबवली आहे का, हे तपासावे. नसल्यास, जमिनीच्या नुकसानीचा मोबदला देण्याबाबत कार्यवाही करावी तसेच मोजणीचे विषय मार्गी लावावेत. ऐतिहासिक पर्यटनक्षेत्र किल्ले रसाळगड येथील जनसुविधा केंद्र, रस्त्यांचे डांबरीकरण, सरंक्षण भिंत याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी यांनी पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करावा. वनविभागाने त्यांच्या जमिनींवर कोणीही कामे करत असतील तर त्यावर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com