

35690
तळेरे ः राजू जठार यांचे अभिनंदन करताना नितीन वाळके व इतर.
सिंधुदुर्ग व्यापारी महासंघ
कार्यवाहपदी राजू जठार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ६ : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यवाहपदी येथील आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ राजू जठार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
जठार यांनी संघटनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांत त्यांच सक्रिय सहभाग आहे. जिल्ह्यात व्यापार विषयक विविध योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा कार्यवाहपदी निवड झाल्याबाबत व्यापारी संघटनेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
---
35689
म्हापण ः येथे भाजप स्थापना दिन साजरा करण्यात आला.
भाजप स्थापना दिवस
म्हापण येथे उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ६ ः येथील भाजप कार्यालयात ४७ वा भाजप स्थापना दिन पक्षाचा झेंडा उभारून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य विष्णू उर्फ आप्पा फणसेकर, कार्यालय आणि शक्तिकेंद्र प्रमुख आनंद गावडे, म्हापण ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद चव्हाण, बुथ प्रमुख श्री. शिवलकर, दादा केळूसकर, प्रदीप गवंडे, श्री. रावले, श्री. मोंडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.