सिंधुदुर्गनगरीत निवृत्त शिक्षकांचे आंदोलन

सिंधुदुर्गनगरीत निवृत्त शिक्षकांचे आंदोलन
Published on

35698

सिंधुदुर्गनगरीत निवृत्त शिक्षकांचे आंदोलन

विविध मागण्या; जिल्हा परिषद भवनासमोर ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. याबाबत प्रशासनाकडे विविध मागण्या करत प्रलंबित मुद्यांवर बोट ठेवले. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनास निवेदनही देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवृत्त प्राथमिक शिक्षकांना निवृत्तीनंतर आनंदी जीवन जगण्यासाठी दिले जाणारे जीवन वेतन निधी सातत्याने अनियमित दिले जाते. त्यासाठी राज्य कोषागार कार्यालयाकडील नियम २०१८ चे मार्गदर्शन विचारात घेतले जात नाही. ज्येष्ठ नागरिक सनद मधील मार्गदर्शक सूचनांचे वाचनच केले जात नाही. याबाबत सेवानिवृत्त वयोवृद्ध, विकलांग, विविध व्याधीग्रस्त प्राथमिक शिक्षक एकाकीपणा जीवन जगत आहेत. याबाबत केवळ निवृत्ती वेतनधारकांसाठी आयोजित पेन्शन अदालती मध्ये चर्चा होते. मात्र, कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. या भूमिकेमुळे प्रशासनाबाबत सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तरी याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका ठेवत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षकांकडून केली जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषद भवनासमोर सेवानिवृत्त शिक्षकांनी धरणे आंदोलन केले.
-----------
या आहेत प्रमुख मागण्या
वरिष्ठ वेतनश्रेणी १९६७ ते १९८६ पर्यंतच्या १२८३ शिक्षकांच्या यादीपैकी ५२२,(२० टक्के) शिक्षकांना प्राप्त झाली आहे . उर्वरित १९८७ ते आजपर्यंत पात्र शिक्षकांची सूची अद्याप तयारच करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद पुरस्कार जिल्हा परिषद फंडातून दिला जातो, त्याप्रमाणे वेतन वाढीचे वेतन निश्चित नाही. बढतीचे तसेच उत्कृष्ट कामाची वेतन वाढ तीन-तीन वर्षे पूर्तता नाही. सेवानिवृत्तीची चार ते पाच वर्षे संपली तरी गट विमा मिळत नाही. माहिती अधिकार २००५ चा वापर करून मागितलेली माहिती तालुकास्तरावरून दिली जात नाही. या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हा परिषद प्रशासनामध्ये उदासीनता, निष्क्रियता दिसून येत आहे. तरी संबंधित यंत्रणेला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली जावी. अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनास दिलेल्या निवेदनातून केली आहे.
------------
दखल न घेतल्यास साखळी उपोषण
या आंदोलनाची दखल न घेतल्यास १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन केले जाईल. प्रसंगी अध्यक्ष म्हणून आपण बेमुदत उपोषणास प्रारंभ करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com