आंबा बागायतदारांची गुरूवारी पुण्यात बैठक

आंबा बागायतदारांची गुरूवारी पुण्यात बैठक
Published on

आंबा बागायतदारांची
गुरूवारी पुण्यात बैठक
पावस : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांची एक विशेष बैठक खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुण्यात कृषी आयुक्तालयात गुरूवारी (ता. ९) दुपारी १२ वाजता आयोजित केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चुकीची किंवा भेसळयुक्त कीटकनाशकांचा पुरवठा झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत. याच्या वापरामुळे आंबापिकावर गंभीर विपरित परिणाम दिसून आला असून, फळगळ, झाडांची हानी तसेच मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना अनेक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या संदर्भात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाठवलेल्या पत्रानुसार संबंधित कंपन्या, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आणि बाधित शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष बैठक आयोजित केली आहे.
-----------
किरण जानकर
यांना विजेतेपद
खेड ः स्नेहगंध अंतर्गत घेण्यात आलेल्या ४०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये चाटव शाळेच्या पदवीधर शिक्षिका व शिक्षक समिती खेडच्या महिला प्रतिनिधी किरण जानकर यांनी विजेतेपद पटकावले. या अगोदर देखील योगासन स्पर्धा, धावणे स्पर्धा व कबड्डी स्पर्धेमध्ये जानकर यांनी अनेक बक्षिसे पटकावली आहेत.
---------
वेरवलीत आज
पालखी नृत्य सोहळा
पावस ः तालुक्यातील वरवेली येथील ग्रामदेवता श्री हसलाई देवी पालखी नृत्यपथकातर्फे मंगळवारी (ता. ७) रात्री १० वा. सहान येथे हसलाई देवी पालखीचा नृत्य सोहळा आयोजित केला आहे. ढोलताशांच्या गजरात व सनईच्या मंजूर स्वरामध्ये पालखी नृत्य विविध चालींवर सादर करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आाहन हसलाई देवी पालखी नृत्यपथक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
-----------
गणपतीपुळे येथे
आंब्याची सजावट
पावस : चैत्री संकष्टीनिमित्ताने गणपतीपुळे येथील मंदिरातील स्वयंभू गणपती मूर्तीला आंब्यांची सजावट करण्यात आली. गणपतीपुळेत दर महिन्याच्या संकष्टीला विविध प्रकारची सजावट केली जाते. त्या त्या काळात उपलब्ध असणारी फळे तर कधी फुलांच्या सजावटीचा त्यात समावेश असतो. आंबा हंगामाच्या सुरवातीच्या काळात आंब्याच्या मोहोराची सजावट केली जाते. आजच्या संकष्टीदरम्यान हापूस आंब्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे आंब्यांची सजावट करण्यात आली आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com