

टँकर सुरू करण्याचा
एकही प्रस्ताव नाही
वैदेही रानडे; पाणीटंचाईसाठी प्रशासन सज्ज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या वाड्यावस्त्यांत, गावात पाणीटंचाई आहे त्या ठिकाणी तातडीने पाणी टँकर पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या टँकर सुरू करण्याचा एकही प्रस्ताव आलेला नाही. टँकर टंचाईचा प्रस्ताव आल्यास त्या त्या तालुक्यात पाणी टँकर सुरू करणार, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदेही रानडे यांनी दिली.
दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवत असते. यंदा मार्चमध्येच पाणीटंचाईस सुरवात झाली आहे. चिपळूण, लांजासह इतर तालुक्यात पाणीटंचाईच्या तक्रारी वाढत आहेत. पाणीटंचाई, टँकरविषयी सीईओ रानडे यांना विचारल्या त्या म्हणाल्या, ज्या तालुक्यात टँकरची मागणी येईल त्या ठिकणी तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जलजीवन मिशनची कामे निधीअभावी रखडलेली आहेत. बहुतांश कामे झालेली आहेत. काही कामे अंतिम टप्प्यावर आली आहेत. ७० ते ९० कोटींचा निधी येणे अपेक्षित आहे. अद्याप निधी आलेला नाही. निधी आल्यास कामे सुरू होऊन कामांना वेग येईल, असेही रानडे यांनी सांगितले. शिक्षकांच्या जनगणनेसंदर्भात अद्याप तरी कोणतेही पत्रक शिक्षण विभागाला, आम्हाला आलेले नाही. पत्रक आल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येईल, असेही रानडे यांनी सांगितले.
चौकट
एचपीव्ही लस सुरक्षित, अफवेला बळी पडू नका
रत्नगिरी जिल्ह्यात एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) ही लस महाग असून, तिचा तुटवडा आहे. जिल्ह्यासाठी १० हजार ६०० लस प्राप्त झाल्या आहेत. या लसीबाबत अफवा पसरवण्यात येत आहेत. १४ वर्षे वयोगटातील मुलींनी ही लस घ्यावी. ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी पालकांनी मुलींना लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा, शासनामार्फत ही लस मोफत देण्यात येते, असेही रानडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.