खारवी समाज पतसंस्थेला ३८ लाखांचा नफा

खारवी समाज पतसंस्थेला ३८ लाखांचा नफा
Published on

खारवी समाज पतसंस्थेस ३८ लाख नफा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : खारवी समाजविकास नागरी सहकारी पतसंस्थेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३८ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, ९७.२० कर्जवसुली झाली असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली.
पतसंस्थेची स्थापना २०१८ ला झाली. ३१ मार्चअखेर संस्थेचा एकत्रित व्यवसाय ४० कोटी १७ लाखांपर्यंत पोहोचला. ठेवी २३ कोटी ८९ लाख, कर्जवितरण १६ कोटी २८ लाख आणि गुंतवणूक ९ कोटी ४४ लाख इतकी झाली आहे. ९७.२० टक्के वसुली, ३८ लाखांहून अधिक निव्वळ नफा आणि अत्यल्प १.८४ टक्के नेट एनपीए असल्याचे पावरी म्हणाले. संस्थेचे खेळते भांडवल २४.१७ टक्के वाढले, स्वनिधी २१.४७ टक्के, ठेवी २५.०३ टक्के, कर्ज वितरण ३२.५८ टक्के, गुंतवणूक ११.९१ टक्के व निव्वळ नफा १७.९६ टक्क्यांनी वाढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com