-मुनींच्या वक्तव्याविरोधात मराठा महिला संघ आक्रमक

-मुनींच्या वक्तव्याविरोधात मराठा महिला संघ आक्रमक
Published on

-rat६p२१.jpg-
P26O35723
दापोली ः तहसीलदार अर्चना बोंबे यांना निवेदन देताना मराठा महिला संघाच्या प्रतिनिधी.
-----------
वादग्रस्त विधान मागे घ्या
मराठा महिला संघाची मागणी; तहसीलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ६ ः एका मुनीने केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ दापोली मराठा महिला संघाच्यावतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी संघाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री यांच्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन दिले.
मुनींनी स्वराज्यरक्षिका महाराणी ताराराणी यांच्याबाबत चुकीचे विधान केले आहे.
इतिहासातील उपलब्ध नोंदी व संशोधनानुसार त्यांनी औरंगजेबाविरुद्ध लढा देत त्यांनी स्वराज्य टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाबाबत चुकीची माहिती प्रसारित करणे म्हणजे इतिहासाचा अवमान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित मुनींनी वक्तव्य तत्काळ मागे घेऊन जाहीर माफी मागावी, असा इशाराही देण्यात आला. निवेदनावर भारती शिंदे, ज्योती जाधव, प्रज्ञा पाटील, नीशा सावंत, उल्का जाधव, सुविधा जाधव आदी महिला प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या असून, तहसीलदार अर्चना बोंबे यांना निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com