

swt621.jpg
35729
बांदा ः खेमराज प्रशालेत स्मार्ट बोर्डचे अनावरण करताना मान्यवर.
बांदा खेमराज प्रशालेला
भाजपकडून स्मार्ट बोर्ड
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः भाजपचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेला स्मार्ट बोर्ड प्रदान करण्यात आला. यासाठी शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
या स्मार्ट बोर्डचे अनावरण महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, बाबा काणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आम्ही सर्व खेमराज प्रशालेचे माजी विद्यार्थी असून शाळेसाठी डावखरे यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभारी आहोत. शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे कोरगावकर यांनी केले.
याप्रसंगी बांदा मंडल उपाध्यक्ष गुरू कल्याणकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, नीलेश नाटेकर, प्रवीण देसाई, बाळू सावंत, सिद्धेश महाजन, माजी मुख्याध्यापक नंदकिशोर नाईक, प्रा. प्रदीप देसाई, पर्यवेक्षक प्रमोद सावंत, उपप्राचार्या मिलन वसकर उपस्थित होते. रणधीर रणसिंग यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद सावंत यांनी आभार मानले. या दातृत्वाबद्दल बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.